Monday, August 16, 2004

नियमितपणा बराच आहे - अपेक्षेपेक्षा

मला वाटले होते की काही दिवसातच मी हा उपद्व्याप सोडून देईन. पण बरेच दिवस झाले, मी अजूनही लिहितोच आहे. आनंद आहे.

असो.

Sunday, August 15, 2004

झोप येते आहे मरणाची

काल रात्री झोपायला झाला उशीर. आता पेंग येते आहे मरणाची. कोणती बैठक नाही म्हणून बरे. नाहीतर पंचाईत झाली असती.

एका तासाची गोष्ट

कचेरीत काम करताना एक गोष्ट लक्षात आली - वेळेचा अपव्यय खूप होतो. यावर एक सोपा उपायही सापडला, एका तासाची गोष्ट.

आपण सर्वसाधारणपणे आपल्याला आवडणारे काम जास्त करतो आणि नावडती कामे बाजूला ठेवणे पसंत करतो. यावर उपाय हा की कोणतेही काम एका तासापेक्षा जास्त वेळ करायचे नाही. इतका फायदा होतो या युक्तीचा!! नावडती कामेसुद्धा आपसुक व्हायला लागतात.

Wednesday, August 11, 2004

आणखी एक आठवडा संपला

वेळ काय भरभर निघून जातो. हां हां म्हणता एक आठवडा संपलादेखील. पुन्हा उद्या परवा सुट्टी. पुन्हा आराम. पुढल्या आठवड्यात भरपूर काम केले पाहिजे.

Monday, August 09, 2004

केवळ मराठी लिहिता यावे म्हणून हा सगळा उपद्व्याप

अन्यथा याला तसा काही विशेष अर्थ नाही. पण आता वेगात सुधारणा नक्कीच जाणवते. पूर्वी बरहामधे जेवढा वेग होता साधारण तेवढा वेग आता inscript मधेही आला आहे. सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा की आता windows किंवा linux कोणतीही operating system असली तरी काही फरक पडणार नाही.

Sunday, August 08, 2004

पुन्हा सुरुवात

तीन दिवसांच्या खंडानंतर आज पुन्हा काहीतरी लिहून काढतो आहे. विशेष काही नाही. दगदग थोडी जास्त झाली. पण हे होणारच.

Thursday, August 05, 2004

आजचा दिवस

बरेच काम करुन झाले आज. कागद सगळे नीट लावून झाले. आता काम करणे सोईचे आहे. हे एकदा करायलाच हवे होते. आता उद्या, परवा सुट्टी. आरामः कल्पवृक्षाणाम् विरामः सकलापदाम् ;)

Wednesday, August 04, 2004

वेळ

वेळेचे महत्त्व काय सांगू?

सतत घड्याळ बघत रहायला पाहिजे. आज मी तेच करतो आहे. खूप नवीन गोष्टी कळतात. वेळ किती आणि कसा मोडतो ते कळते.